"युवराजांना मिळणारी टक्केवारी कमी झाली आहे." - Nitesh Rane | Bhagat Singh Koshyari | Shivaji Maharaj

  • 2 years ago
मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुंबई पालिकेत टेंटर, बदल्यांवरून टाईमपास सुरू आहे. मुंबईतील रस्त्यांसाठी ५ हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती. मात्र मर्जीतील लोकांना टेंडर न मिळाल्याने ते रद्द करण्यात आले का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्या याच प्रश्नाला आता भाजपाचे नेते नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे. युवराजांना मिळणारी टक्केवारी कमी झाली आहे. मुंबईतील ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत, आदित्य ठाकरेंनी माझ्यासोबत यावे, मी त्यांना ही कामे दाखवतो, असे नितेश राणे म्हणाले आहेत.

#NiteshRane #BhagatSinghKoshyari #ChhatrapatiShivajiMaharaj #BJP #AdityaThackeray #Shivsena #Maharashtra #HWNews

Recommended