टी-20 त ख्रिस गेल चा 800 षटकारांचा विश्वविक्रम | Lokmat Marathi News
  • 3 years ago
वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने बांगलादेश प्रिमियर लीग स्पर्धेत तुफानी खेळी केली. गेलने रंगपूर रायडर्सकडून खेळताना 126 धावांची खेळी केली. त्याने केवळ 51 चेंडूत 14 षटकार आणि 6 चौकार मारले. गेलेचे टी-20 मधील  हे  19वे शतक ठरले. या खेळीत त्याने एक नवा विश्वविक्रम स्वत:च्या नावावर केला.  टी-20 प्रकारात 800 षटकार ठोकणारा गेल जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. गेलनंतर दुसऱ्या क्रमांकावर किरॉन पोलार्ड असून त्याच्या नावावर ५०६ षटकार आहेत. गेलने 318 टी-20 सामन्यात 801 षटकार मारले आहेत. त्यापैकी 103 षटकार आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यातील आहेत. सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत पोलार्ड (506), ब्रेंडन मॅकलम (408), ड्वेन स्मिथ (351) आणि डेव्हिड वॉर्नर (314) यांचा क्रमांक लागतो. 
याआधीचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता. गेलने  टी-20 करिअरमध्ये 14 वेळा एका सामन्यात 10 पेक्षा अधिक  षटकार मारले आहेत. जगातील अन्य कोणत्याही फलंदाजाने एका इनिंगमध्ये दोन पेक्षा अधिक वेळा 10 षटकार मारले नाहीत. टी-20 तील शतकांचा विचार केला तर गेलच्या नावावर 19 शतके आहे. याबाबत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या फलंदाजांच्या नावावर प्रत्येकी 7 शतके आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended