Rhea Chakraborty Drugs Connection , होणार ब्लडटेस्ट | Sushant Singh Rajput Case | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी रोज नवं खुलासे होतायेत. मंगळवारी या प्रकरणातील एक मोठा खुलासा झाला. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी रिया अमलीपदार्थांचं सेवन व तस्करीमध्ये सहभाग असल्याचा, संशय (ईडी ) आहे.
आतापर्यंत रियाकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत त्यापैकी एका मोबाईलच्या व्हाट्सअपचॅटमध्ये अमली पदार्थाबाबत अस्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे ड्रग्जचे सेवन व ते मागविण्यात तिचं काही कनेक्शन आहे का, या अनुषंगाने तपास केला जात आहे. त्याबाबत माहिती मिळविण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकालाही कळविण्यात आले आहे. मात्र एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. 
रियाने तिच्या आयुष्यात कधीही ड्रग्स घेतले नाहीत. त्यामुळे ती तिची रक्त तपासणी करण्यासही तयार आहे. असं रियाचे वकिल सतीश मानशिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
तर दुसरीकडे विशेष पथकाने मंगळवारी सुशांतचा लेखा परीक्षक (सीए) संदीप श्रीधर आणि मित्र सिद्धार्थ पिठानी, यांच्याकडे सखोल चौकशी केली ईडीकडून मिळालेला दस्ताऐवज, सुशांतचे बँक अकाउंटचे डिटेल्स, आर्थिक व्यवहार, खर्च, गुंतवणूक, आयटीआरबद्दल सविस्तर तपशील घेतला त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळणार हे नक्की.

#lokmatcnxfilmy #RheaChakraborty #Bloodtest #SushantSinghRajput
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended